कितीही सुंदर मुलगी दिसली तरी, तिची स्तुती करुन तिला
हरभराच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच
नाही.....
कोणाच्या मागे शिट्ट्या मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच
नाही.....
कोणी जर आवडलीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच
नाही.....
दुसरयाचे विचार ऎकत असताना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच
नाही.....
कधी हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुष्टिकोनानी कधी बघितलेच
नाही
या व्यतिरीक्त दुसरे
काही आम्हाला ऎकायला मिळालेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच
नाही.....
प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाला कधी समजलेचनाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच
नाही.....
फुलपाखराप्रमाणे आम्ही ही
बरयाच सुंदर फुलांमधे वावरत होतो
पण जाउन बसण्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच
नाही
Saiprasad
No comments:
Post a Comment